breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

उर्मिला अभिनयासाठी नाही सॉफ्ट पॉर्नस्टारसाठी ओळखली जाते,’ कंगनाची जीभ पुन्हा घसरली

मुंबई – अभिनेत्री कंगना रानौतच्या विरोधात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेही टीका केली होती. उर्मिला टीका केल्यानंतर तिला प्रत्युत्तर देताना कंगनाची जीभ घसरली आहे. ‘उर्मिलाला अभिनेत्री म्हणून ओळखलं जात नसून ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे,’ असं कंगना म्हणाली. तिच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडकर पुन्हा एकवटले असून कंगनाला विरोध केला आहे.

“उर्मिला मातोंडकर… ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परिचित नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला (तिकीट) का नाही मिळणार?” दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. उर्मिला मातोंडकर यांनी संपूर्ण मुलाखतीत आपल्या संघर्षाचा अवमना केल्याचा दावाही कंगनाने केला.

उर्मिला मातोंडकर काय म्हणाल्या?

“संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात आहे. मात्र, हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचे उगमस्थान असल्याची कंगनाला कल्पना आहे का? ‘क्या उखाड दोगे, किसके बाप का राज है’ अशी भाषा कोणती सुसंस्कृत मुलगी वापरते? तिच्या ऑफिसवर झालेली कारवाई निंदनीयच आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. भाजपकडून निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी ती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.”

ड्रग्जचे सेवन करणाऱ्या बॉलिवूडमधील कलाकारांची नावे जाहीर करण्याच्या कंगनाच्या दाव्यावर उर्मिला म्हणाल्या की, “नावे कुठे आहेत? माझी इच्छा आहे की कंगनाने प्रत्यक्षात पुढे यावे आणि त्या सर्वांची नावे घेऊन इंडस्ट्रीला मदत करावी. चला सफाई करुया. यामध्ये मी तुला पाठिंबा देणारी पहिली व्यक्ती असेन मुली.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button