breaking-newsTOP NewsUncategorizedगणेशोत्सव-२०२३मनोरंजनमराठवाडामहाराष्ट्र

गणेशोत्सव 2022 ः गणेशोत्सवानिमित्त एक्झर्बिया अॅबोड, जांभुळ सोसायटीच्या वतीने विविध बहारदार कार्यक्रमांचे आयोजन

  • लहान मुले, महिला, तसेच युवकांसाठी विविध स्पर्धा, 
  • रक्तदान शिबीराचे आयोजन
  • होम मिनिस्टर,  खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

। वडगाव-मावळ, (पुणे)। महाईन्यूज । गणेश क्षिरसागर ।

दोन वर्षानंतर गणेश उत्सव पुन्हा ढोल ताशाच्या गजरात, जल्लोषात साजरा होत आहे. यावर्षी प्रत्येक उत्सव मंडळ काहीतरी आगळे वेगळे करत आहे. त्यामुळे यंदा गणेश उत्सवाला अधिकच रंगत आली आहे. श्रीगणेशमूर्ती घरात आल्यावर आपल्या घरात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. घरात प्रसन्नता निर्माण होते. आप्तेष्ट मित्र यांच्या भेटी झाल्याने आनंद द्विगुणित होत असतो. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा, ज्ञानाचा अधिपती बाप्पा गणराजाचे बुधवार दिनांक 31 रोजी गणपतीचे थाटामाटातआगमन झाले. मावळ तालुक्यातील वडगाव जांभुळ येथील एक्सर्बिया अॅबोड या सोसायटीच्या गणेशोत्सवाला आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचे कारण म्हणजे गणेशोत्सवानिमित्त एक्झर्बिया अॅबोड, जांभुळ सोसायटीच्या वतीने 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान विविध बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोयायटीच्या प्रशस्त प्रांगणात मनोरंजनाचे खास कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष धनंजय वाणी, उपाध्यक्ष दीपक पाटील, खजिनदार पंढरीनाथ हिंगे, कार्यवाहक गणेश क्षिरसागर यांनी महाईन्यूजला दिली. तसेच सोसायटीच्या सर्व रहिवाशांनी या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष वाणी यांनी केले आहे.

 

On the occasion of Ganeshotsav, Exerbia Abode, organized various bahardar programs on behalf of Jambhul Society

 

एक्सर्बिया अबोडच्यावतीने आयोजित कार्यक्रमाची रुपरेषा

  • 31 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 6.30 वाजेदरम्यान, बाप्पांच्या आगमनानिमित्त मिरवणूक, स्थापना व आरती कार्यक्रम
    1 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 11 दरम्यान, जांभूळगाव येथील महिलां मंडळाचा भजनाचा कार्यक्रम
    2 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 10 दरम्यान, धनंजय वाणी यांचे अग्निरोधक मार्गदर्शनपर प्रशिक्षण शिबीर
    3 सप्टेंबर रोजी लहानग्यांसाठी पोते उडी, यामध्ये लहान तसेच मोठा गटही सहभागी होऊ शकणार आहे.
    5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 8 दरम्यान, मुला-मुलींच्या लहान, मोठ्या गटासाठी चित्रकला स्पर्धा तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
    6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत लहान व मोठ्या गटासाठी लिंबू चमचा स्पर्धा तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा होणार आहेत.
    7 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 ते 11 मराठी चित्रपट अभिनेते, निवेदक, तळेगाव, इंदुरीचे अविनाश शिंदे यांचा सोसायटीमधील महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • सोसायटीमधील रहिवाशांनी जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन मंडळाच्या कार्यकारिणी कमिटीने केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button