breaking-newsपिंपरी / चिंचवड

अत्याचार करून मुलीचा खून करणा-या नराधमांना फाशी द्या, शिवसेनेची मागणी   

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपळे सौदागर येथील अडीच वर्षाच्या मुलीचा अत्याचार करून खून करणा-या नराधमांना तात्काळ अटक करण्यात यावी. त्या नराधमाला भर चौकात फाशी द्यावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी व युवासेनेच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून आरोपींवर आरोपपत्र  दाखल करावे. तसेच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी. यासाठी प्रख्यात वकिलांची नियुक्ती करावी. अशी मागणी करण्यासाठी शिवसेना महीला आघाडी व युवासेना पिंपरी यांनी सांगवी पोलीस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणाचा तत्कळ छडा लावण्याची विनंती शिवसैनिकांनी पोलिसांना केली. मृत मुलीच्या आई-वडिलांना युवासैनिकांना धीर देण्यात आला. यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, स्वरुपा खापेकर, वैशाली कुलथे, शशीकला उभे, कामिनी मिश्रा, विभाग संघटक निलेश हाके, रवि नगरकर, राज पिसाळ, ॲड. अजित बोराडे, उषा आल्हाट, अनुजा कुमार, विवेक तितरमारे, निर्मली पाटील, नैना गोळे, शिल्पा अनपन, श्वेता कापसे, अनुराधा आहेर, शैला निकम उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button