breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी वाघेरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावरील पुतळा बसविणार

  • विविध विकास कामांसाठी 27 कोटी रुपयाची मंजुरी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी वाघेरे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावरील आसनस्थ पुतळा बसविण्यात येणार आहे. तसेच त्या परिसराच्या विकासासाठी सुमारे ७४ लख ८९ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी सुमारे २७ कोटी ६१ लाख रुपयांच्या खर्चास आज (बुधवार) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या प्रभागात तीन मजली सुसज्ज गार्डन साकारण्यात येणार आहे. याकरिता पूर्णानगर येथील सेक्टर क्रमांक १८ सी.डी.सी.मधील मोकळी जागा क्र.४ पर्यटन केंद्राच्या धर्तीवर विकसित करण्याचे नियोजन आहे. त्या कामास सुमारे १४ कोटी ९६ लाख ८० हजार रूपये खर्चास मंजुरी देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिकेचा महत्वकांशी असलेला पवना धरणातून बंद पाईप लाईनमधून पाणी आणण्यात येणार होते. मात्र, सदरील प्रकल्प स्थगिती असल्याने त्या ठेकेदारांना काम थांबविण्याची विनंती केली. त्यामुळे हा प्रकल्प अर्ध्यावरच गुंडाळण्यात आलेला आहे. त्या प्रकल्पाच्या पाईप स्थलांतर करण्यास सुमारे ८० लाख रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

थेरगांव येथील बापुजीबुवा नगरमधील सर्व्हे नं.९ याठिकाणी दवाखाना या इमारतीचे बांधकाम (२०० बेडसाठी) चालु आहे. या इमारतीत उच्चदाब वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्या कामाचे सुमारे ८४ लाख ६४ हजार रूपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
चिखली मधील सेक्टर नंबर १६ राजेशिवाजी नगरमध्ये फुटपाथ विकसित करण्यास सुमारे १ कोटी १२ लाख ५३ हजार रूपयाच्या खर्चास या
मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ६ धाडेवस्ती, भगतवस्ती , गुळवेवस्ती परिसरामध्ये स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्यात येणार आहे. त्या कामास सुमारे ६२ लाख ५५ हजार रूपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली.  सायन्स पार्क तारांगण (टप्पा २) याठिकाणी उर्वरित कामे करण्यास सुमारे २ कोटी २७ लाख ४२ हजार रूपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक २ मधील बो-हाडेवाडी, खिरीडवस्ती, आहेरवाडी, आल्हाटवस्ती, विनायकनगर याठिकाणी रस्ते डांबरीकरण करणे, त्या कामास सुमारे ८८ लाख ३० हजार रूपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button