breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…तर पिंपरी-चिंचवड भाजपासुद्धा न्यायालयात जाणार!

  • भाजपा प्रवक्ते अमोल थोरात यांची माहिती
  • निवडणूक प्रभाग रचनेबाबत पक्षपातीपणा नको

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करताना राजकीय हस्तक्षेप करुन अन्याय केला जाणार असेल, तर पुणेकरांप्रमाणे पिंपरी-चिंचवडकरसुद्धा न्यायालयात याचिका दाखल करतील, असा इशारा भाजपा प्रवक्ते आणि संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिला आहे.

पुणे महापालिका प्रभाग रचनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रवीण शिंदे यांनी याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग आणि पुणे महापालिका यांना यामध्ये प्रतिवादी करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने कच्चा प्रारूप आराखडा तयार केला. पण, त्याची गोपनीयता भंग झाली आहे. सूस, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी यासह इतर भागाची नैसर्गिक सीमा तोडण्यात आली आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे.
दरम्यान, पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवड भाजपाकडूनही प्रभाग रचनेतील राजकीय हस्तक्षेपाला आव्हान देण्यात येणार आहे.

प्रवक्ते अमोल थोरात म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना भौगोलिकदृष्ट्या अचूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी गुगल अर्थ या ॲप्लीकेशनचा वापर करण्यात यावा. तसेच प्रभाग रचनेत पारदर्शकता असावी म्हणून राजकीय हस्तक्षेप खपवून घेऊ नये, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही अटी-शर्तींचे उलंघन करुन प्रभागांची अवास्तव तोडफोड करण्यात आल्याची शक्यता आहे. अन्यायकारकपणे प्रभागरचना करून पक्षपातीपणा होत असेल, तर आम्हीसुद्धा न्यायालयात जाणार आहोत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button