breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अडीच वर्षांच्या चिमुरडीणे कलावंतीण सुळक्यावर फडकविला तिरंगा

मुंबई | महाईन्यूज

ज्या वयात आई-बाबांचे हात धरून चालायचे, त्यांच्या अंगा-खांद्यावर खेळायचे त्या वयातली चिमुरडी चक्क गड-किल्ले मोठय़ा उत्साहात चढते आणि पाहणाऱ्यांना थक्क करून टाकते. प्रजासत्ताकदिनी या चिमुरडीने कर्जत-पनवेलच्या सीमेवर असलेल्या प्रबळगडाचा कलावंतीण सुळका सर करून तिरंगा फडकवला. शर्विका म्हात्रे असे या चिमुरडीचे नाव आहे. अलिबाग तालुक्यातील लोणारे गावची ही गडकन्या आहे. वडील जितेन म्हात्रे हे गडप्रेमी आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जितेन गड-किल्ल्यांवर जात असतात. तर शर्विकाची आई अमृता म्हात्रे या शिक्षिका आहेत. दोघांनाही गड-किल्ल्याविषयी आकर्षण असल्याने ते आकर्षण या चिमुरडीतही पाहायला मिळते.

प्रबळगडाचा कलावंतीण सुळका हा २३०० फूट एवढय़ा उंचीवर आहे. आकाशाला गवसणी घालणारा, कोणताही संरक्षक आसरा नसलेला अरुंद पायऱ्या, निसरडी वाट आणि काळजात धडकी भरविणारी खोल दरी अस हा सुळका सर करताना भल्याभल्यांना घाम फुटतो आहे. आणी प्रजासत्ताकदिनी जितेन म्हात्रे त्यांची पत्नी अमृता म्हात्रेंसोबत काही गडप्रेमी आणि अडीच वर्षांची चिमुरडी शर्विका यांनी हा सुळका सर केला. या मोहिमेत शर्विकाची हा सुळका चढतानाची सुरू असलेली धडपड आणि जिद्द वाखाणण्याजोगी होती. तिचे या मोहिमेत मोठे कौतुक होत होते. कलावंतीण सुळका पार केल्यानंतर तिच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. सध्या ही अडीच वर्षांची चिमुरडी शर्विका गावात कौतुकाचा आणि अभिमानचा विषय बनली आहे. एका वर्षांत शंभर गड-किल्ले सर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे शर्विकाचे वडील जितेन म्हात्रे यांनी सांगितले आहे.

  • अकरा गड-किल्ले मोहिमेत शर्विकाचा समावेश

विशेष म्हणजे शर्विकाला एवढय़ा कमी वयात काही गड-किल्ल्यांची नावे पाठ आहेत. आतापर्यंत ती अकरा गड-किल्ले चढणे, फिरण्याच्या मोहिमेत सहभागी झालेली आहे. यात काही जलदुर्ग असले तरी सरसगड, प्रतापगड, रायगड आणि प्रबळगडाचा कलावंतीणीचा सुळका असे उंच गडही समाविष्ट आहेत. कोर्लईचा किल्ला, खांदेरी-उंदेरी, कुलाबा किल्ला, रेवदंडय़ाचा भुईकोटा, जंजिरा, पद्मदुर्ग यावरही ती फिरली आहे. त्या सर्वाची नावेही तिला पाठ आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button