breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

विना अपघात सेवा केलेल्या एसटीचालकांचा सपत्नीक सत्कार – ॲड. अनिल परब

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी

एसटी महामंडळामध्ये सलग २५ वर्ष विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांची यादी करून त्यांचा यथोचित सत्कार करण्याबाबतचा नव्याने प्रस्ताव लवकरच तयार करावा असे निर्देश परिवहन मंत्री तथा , एसटी महामंडळचे अध्यक्ष ‚ॲड. अनिल परब यांनी एसटीच्या संबंधित विभागाला दिले. एसटी महामंडळाच्या २९१ व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रधान सचिव,परिवहन, आशिष कुमार सिंह , परिवहन आयुक्त, शेखर चन्ने , कामगार आयुक्त, महेंद्र कल्याणकर तसेच एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री,ॲड.अनिल परब पुढे म्हणाले, ” सलग २५ वर्ष विना अपघात सुरक्षित सेवा बजावणाऱ्या चालकांना रु. १५,००० रोख शाल , श्रीफळ ,२५ वर्ष सुरक्षिततेचा बिल्ला व त्याच्या धर्म पत्नीस साडी-चोळी देऊन समारंभ पूर्वक गौरविण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. “ सध्या एसटीमध्ये सुमारे ३४००० चालक काम करतात. गेली ७० वर्ष महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला सुरक्षित सेवा देण्यामध्ये एसटी महामंडळाच्या चालकांचे भरीव योगदान आहे. त्यांच्या सुरक्षित सेवेमुळेच प्रवाशांमध्ये एसटीबद्दल विश्वासार्हतेची भावना निर्माण झाली आहे. आपल्या एकूण सेवा कालावधीमध्ये सलग २५ वर्ष विना अपघात सुरक्षित सेवा देणारे चालक खऱ्या अर्थाने एसटीच्या सुरक्षित प्रवासाचे *"ब्रँड अम्बॅसिडर"* आहेत. अशा चालकांचा सपत्नीक यथोचित सत्कार करून इतर चालकांसमोर आदर्श निर्माण करणे व त्यांना प्रोत्साहन देणे हा या योजनेपाठीमागचा मुख्य उद्देश आहे. असे मंत्री, ‚ॲड. अनिल परब यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button