breaking-newsमनोरंजन

सर्वाधिक कमाई करणाऱ्याच्या यादीत अक्षय, सलमानचा समावेश

सर्वाधिक कमाई करणाऱ्याच्या यादीत अक्षय, सलमानचा समावेश फोर्ब्स या मासिकाने 2018 या वर्षाकरिता जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतामधून बॉलिवूडमधील दंबंग अभिनेता सलमान खान आणि खिलाडी म्हणून ओळख असलेला अक्षय कुमार या अभिनेत्यांनी या यादीत स्थान मिळविले आहे.

जगप्रसिध्द मासिक फोर्ब्स यांनी 2018 या वर्षासाठीची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अक्षय कुमार हा सातव्या, तर सलमान खान हा नवव्या स्थानावर आहे. सातव्या स्थानावरील अक्षय कुमारची वार्षिक कमाई ही 283 कोटी आहे. तर सलमान खान यांची वार्षिक कमाई 269 कोटी रूपये असल्याचे फोर्ब्स या मासिकाने नमूद केले आहे.
हॉलिवूडचा सुपरस्टार जॉर्ज क्‍लूनी हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

जॉर्ज क्‍लूनी याची वार्षिक कमाई 1 हजार 672 कोटी रूपये इतकी आहे. दुसऱ्या स्थानी ड्‌वेन जॉन्सन (867 कोटी), तिसऱ्या स्थानी रॉबर्ट डाउनी (566 कोटी), चौथ्या स्थानी ख्रिस हेम्सवर्थ ( 451 कोटी), पाचव्या स्थानी जॅकी चॅन (318 कोटी), सहाव्या स्थानी विल स्मिथ (293 कोटी), आठव्या स्थानी ऍडम सॅडलर (276 कोटी), तर दहाव्या स्थानी ख्रिस इवान्स (237 कोटी) हा अभिनेता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button