breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षधर्म पाळला; आंदोलनात सहभागी

जळगाव । महाईन्यूज । प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षातील प्रदेश पातळीवरील नेत्यांवर नाराज असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर ‘पक्षधर्म’पाळला आहे. पक्षावर नाराजी…अशी चर्चा असताना खडसे यांनी शुक्रवारी ‘महाराष्ट्र बचाओ’आंदोलनात सहभागी होत अनेकांना आर्श्चर्याचा धक्का दिला आहे.

भारतीय जनता पक्षातील फडणवीस-खडसे वाद राज्यातील जनतेला नवा नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पक्षाने उमेदवारी डावलल्यानंतर खडसे पक्ष सोडतील की काय? अशी चर्चा होती. प्रसारमाध्यमांसमोर खडसे यांनी तशी नाराजी जाहीरपणे बोलुनही दाखवली होती.

          दरम्यान, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका करीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रभर ‘महाराष्ट्र बचाओ आंदोनल- मेरा आंगण रणांगण’असे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये खासदार रक्षा खडसे यांच्यासह एकनाथ खडसे सहभागी झाले. विशेष म्हणजे, पक्षाच्या झेंड्यासह…‘उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार’अशी पाटी हातात घेवून राज्य सरकारचा निषेधही केला. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चांना काहीअंशी पूर्णविराम मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button