breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात लवकरच सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरु होण्याची शक्यता; सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख घेणार सीएम उद्धव ठाकरे यांची भेट

महाराष्ट्र राज्य हे कोरोना विषाणूच्या बाबतीत सर्वात प्रभावित राज्य आहे. या विषाणूच्या संक्रमणाची प्रकरणे वाढण्यास सुरुवात झाल्यावर देशात लॉक डाऊन लागू करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या सहा महिन्यात हळू हळू यामध्ये शिथिलता आणली गेली. काल महाराष्ट्र सरकारने 50 टक्के क्षमतेसह हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र अजूनही सिनेमागृहे, नाट्यगृहे यांबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आता, राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्रात सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्यासाठी अमित देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार असल्याचे यांनी थिएटर्स ओनर्सना चर्चेदरम्यान सांगितले. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्स आणि सिंगल स्क्रीन ओनर्स, थिएटर ओनर्स, फिल्म स्टुडिओ ओनर्स असोसिएशनसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी ते म्हणाले, ‘जवळपास सहा महिन्यांपासून राज्यातील सिनेमागृहे व नाट्यगृहे बंद आहेत. येणाऱ्या काळात सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरु करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. लॉकडाऊननंतर सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात प्रेक्षक येण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे. दसरा, दिवाळी, नाताळ या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात त्यामुळे याच काळात सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत असते. सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे सुरु कशी करता येतील याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button