breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

जळगावच्या चोपड्यामध्ये बिबट्या जेरबंद वनविभागाच्या पथकाला यश

जळगाव- जळगावच्या चोपडा तालुक्यातील भार्डू भागासह आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने काल मध्यरात्री जेरबंद केले. हा बिबट्याचा भार्डू भागासह आजूबाजूच्या परिसरात वावर वाढला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

काल मध्यरात्री बिबट्याने काहीतरी खाल्ल्याने अथवा आजारी असल्याने एकाच जागेवर बसल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. भार्डू आणि (लहान) हातेड येथील नागरिकांनी बिबट्यास घेरून ठेवले. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बिबट्यास जेरबंद केले. बिबट्यास पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button