breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड मतदार संघातील रिक्षा व स्कूल व्हॅनचालकांना आमदार निधीतून मोफत गणवेश देणार – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी / महाईन्यूज 

लॉकडाऊनमुळे बिकट आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करण्याची वेळ आल्याने रिक्षाचालक आणि शालेय व्हॅनचालक यांना सामाजिक भावनेपोटी एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. यावेळी चिंचवड विधानसभा मतदार संघातील रिक्षाचालक आणि शालेय व्हॅनचालकांना मोफत गणवेश शिवून देण्याचे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले.

डोनेट एड सोसायटी व सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भंडलकर, सारिका भंडलकर यांच्या प्रेरणेने व सहकार्याने आज (दि. 15) पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात रिक्षा चालक व शालेय व्हॅनचालक यांना धान्यकिट वाटप कार्यक्रम घेण्यात आला. आमदार जगताप यांनी लॉक डाऊनच्या काळात अनेक रिक्षाचालक व शालेय व्हॅनचालक यांचे रोजगार बुडाले असल्याकारणाने सामाजिक जाणीव आणि कर्तव्याच्या भावनेतून एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत धान्य वाटप केले. चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्व रिक्षाचालक व शालेय व्हॅनचालकांना स्वतःच्या विधिमंडळाच्या मानधनातून एक गणवेश शिवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आमदार जगताप म्हणाले की, संपूर्ण वर्ष शाळा व शैक्षणिक संस्था बंद असल्याकारणाने शालेय व्हॅनचालक बांधवांचा रोजगार बुडाला. लॉकडाउन एक व दोनच्या काळात अनेक रिक्षाचालक यांचे व्यवसाय बंद झाले. त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले. एकीकडे शासन पंधराशे रुपये आर्थिक मदत करीत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील रिक्षाचालक व शालेय व्हॅनचालकांना तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केले. परंतु, मनपा आयुक्त राजकीय भूमिकेतून अनुदान देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी करत नाहीत. आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवणार असल्याची ग्वाही आमदार जगताप यांनी याप्रसंगी दिली. ज्या शालेय व्हॅन चालक व रिक्षाचालक बंधूंवर उपासमारीची वेळ आली. त्या सर्वांना वात्सल्यचा घास योजनेंतर्गत सृष्टी चौकात प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने सुरू असलेल्या सेंटर किचन मधून जेवण देले जाईल. पूरक व्यवसायकरिता पतसंस्था व सहकारी बँकेच्या माध्यमातून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य संतोष ढोरे, सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे व संस्थेचे बाबु गंगावणे, मयूर शेलार, संतोष जावणे, पंकज मानेकर, मंदार कुलकर्णी, विकास ढोरे, प्रकाश शिंदे, सागर नांगरे, बाळासाहेब रोकडे, नागेश घारे, हेमा गंगावणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सुमारे दीडशे रिक्षाचालक व शालेय व्हॅनचालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा भंडलकर यांनी केले. आभार प्रदर्शन सारिका भंडलकर यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button