breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात येत्या गुरवारी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे – महापालिकेच्या विविध जलकेंद्रांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता.28) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे, येत्या शुक्रवारी (ता.29) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

पर्वती जलकेंद्र, (पर्वती,पद्मावती, इंदिरानगरा, पंपिंग), वडगाव जलकेंद्र, चतु:श्रृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसर, लष्कर जलकेंद्र आणि नवीन होळकर पंपिंग या केंद्रातील कामे हाती घेण्यात येणार आहेत. जलकेंद्रात स्थापत्य, विद्युतविषयक कामे होणार असून, काही भागात जलवाहिन्यांची देखभालही करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button