breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अखिल भारतीय स्वराज संस्था वादात ; नगरसेवक तुषार कामठे यांची चाैकशीची मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या वतीने महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेली अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था बोगसगिरीच्या आरोपांमुळे कायम वादात आहे. पुन्हा एकदा नगरसेवक तुषार कामठे यांनी चार वर्षात या संस्थेवर झालेल्या खर्चाच 5 कोटींची तफावत निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी महानगरपालिका व संबधित संस्थेने दिलेल्या लाभार्थ्यांच्या व खर्चाच्या आकडेवारीत तफावत कशी, हा प्रश्नही आयुक्तांकडे उपस्थित केला आहे. 

महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाअंतर्गंत महिला प्रशिक्षणाचे काम करणारी ही ठेकेदारी संस्था कायम वादात आहे. यापूर्वी चौकशीचा व ब्लॅक लिस्ट करण्याचा ठराव झाला होता. मात्र, चौकशी व ब्लॅक लिस्ट करण्याचा ठराव रद्द करून याच संस्थेला काम देण्यात आले. त्यानंतर भाजप नगरसेवक कामठे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना या संस्थेबाबत पत्र दिले आहे. त्यांनी महापालिका व ठेकेदारी संस्थेकडून दिलेल्या आकडेवारीवरून महिला प्रशिक्षणाची बोगसगिरी सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, 2013-14 ते 2016-17 या चार वर्षांच्या कालावधीत 8115 प्रशिक्षणाच्या बँचेस झाल्याचे संस्थेच्या आकडेवारीवरून दिसते. तर, पालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून 8491 बॅचेस झाल्याचे नमूद आहे. दुसरीकडे लाभार्थ्यांची संख्या ठेकेदाराने 1 लाख 97 हजार 458 इतकी, तर पालिकेने 2 लाख 5 हजार 695 लाभार्थी संख्या दिली. लाभारर्थ्यांच्या संख्येप्रमाणेच खर्चात देखील 5 कोटींचा तफावत आहे. चार वर्षात 52 कोटी 58 लाख 82 हजार 372 रुपये खर्च झाल्याचे ठेकेदाराने सांगितले असताना पालिकेच्या आकडेवारीत 57 कोटी 78 लाख 48 हजार 249 रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. लाभार्थी संख्या व खर्चातील तफावत बघता या प्रशिक्षणाच्या कामात गोडबंगाल असल्याची शंका कामठे यांनी उपस्थित केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button