breaking-newsपिंपरी / चिंचवड

स्व. सीताबाई लांडे प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे मोफत वाटप

पिंपरी| महाईन्यूज| प्रतिनिधी

– नगरसेवक शाम लांडे यांच्या वतीने कासारवाडीत ‘एक हात मदतीचा’ उपक्रम

कोरोनामुळे मागील बारा दिवसांपासून देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरीभागातील हजारो कुटुंबियांची आर्थिक अडचण झाली आहे. अशा गरीब कुटुंबांना, शहरात भाड्याने राहणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अन्नाची टंचाई भासत आहे. अशा गरजू, गरीब, कुटुंबांना व विद्यार्थ्यांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मदत करण्याच्या उद्देशाने कासारवाडीतील स्व. सीताबाई लांडे प्रतिष्ठान आणि नगरसेवक शाम लांडे मित्रपरिवारच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून अन्नधान्य, किराणा व सॅनिटायझर किटचे मोफत वाटप करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते शाम लांडे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात कासारवाडी परिसरातील सुमारे दीड हजार कुटुंबांना या किटचे मोफत वाटप सोमवारपासून (दि.6) सुरु करण्यात आले. यावेळी शाम लांडे, भोसरी मंडलाधिकारी जयश्री महेश कवडे, भोसरी गाव कामगार तलाठी अश्विनी होडगे, जैन समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक पगारीया, शांतीलाल ओसवाल, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सयाजी लांडे, रमेशबापू लांडगे, राजेंद्र शेळके, विजय गाढवे, नितीन आगरवाल आदींच्या उपस्थित होते.
सोमवारी सकाळी नाशिक फाटा ते सिद्धार्थ पेट्रोलपंप परिसरातील मस्जिद परिसर, दत्तू पठारे चाळ, नवजीवन मंडळ परिसर, कासारवाडी मनपा शाळेसमोरील चाळ परिसर, विष्णू लांडे चाळ या भागात प्राधान्याने वाटप करण्यात आले. उर्वरीत भागात मंगळवार व बुधवारी या किटचे वाटप करण्यात येणार आहे. या किटमध्ये तांदूळ, साखर, चहा पावडर, तेल, तूरडाळ, मसूरडाळ, हरभरा, मीठ, हळद, कांदा मसाला, लाल तिखट, पोहे, मटकी, सोयाबीन, चवळी, वटाणा, गव्हाचे पीठ, डेटॉल साबण, सॅनिटायझर व कोरोनाविषाणू प्रतिबंधक खबरदारी व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयी माहिती देणारे पत्रक देण्यात आले. तसेच नगरसेवक शाम लांडे, मंडलाधिकारी कवडे व तलाठी होडगे यांनी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आणि पोलिस आणि प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन केले.

कासारवाडी येथील नवजीवन चौकातील ज्येष्ठ नागरिक सिद्धेश्वर गुड यांनी नगरसेवक शाम लांडे यांच्याकडून मिळालेल्या किटबाबत समाधान व्यक्त करत सांगितले की, या लॉकडाऊनमुळे आमच्यासारख्या हातावर पोट असणा-या गरीब कुटुंबातील ज्येष्ठांचे खूप हाल होत आहेत. मुलाबाळांचा रोजगार बंद आहे. या मदतीमुळे किमान महिनाभराचा किराणा मालाचा प्रश्न सुटला आहे. अंध ज्येष्ठ नागरिक गणगे काका यांनी सांगितले की, माझ्यासारख्या अंध तसेच दिव्यांग व्यक्तींना या लॉकडाऊनमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे आमच्यासारख्या व्यक्तींवर उपासमारीची वेळ येऊ शकते. नगरसेवक शाम लांडे यांनी आम्हाला दिलेली ही मदत आशीर्वाद योग्य आहे! यातून स्व. सीताबाई लांडे प्रतिष्ठानच्या वतीने सुरु केलेल्या या उपक्रमातून शहरातील इतर सामाजिक संस्था, संघटनांनी व कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन मदतीसाठी पुढे यावे असे मत डॉ. अशोक पगारीया यांनी व्यक्त केले. नगरसेवक शाम लांडे यांनी सांगितले की, कासारवाडीतील पूर्ण परिसरात मागील आठ दिवसात प्रतिष्ठानच्या वतीने जंतूनाशक औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे उद्‌भवलेल्या समस्यांचा एकजूटीने सामना करू. अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त इतर सर्व नागरिकांनी आपल्या घरात राहून प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे. अत्यावश्यक सेवेसाठी 9850987007 किंवा महानगरपालिकेच्या ‘सारथी’वर संपर्क करावा असे आवाहन नगरसेवक शाम लांडे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button