breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी – चिंचवडमध्ये ‘ओमायक्रॉन’चे चार नवे रुग्ण

पिंपरी – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 6 रुग्णांपैकी 4 रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, नवीन चार रुग्णांची भर पडली. त्यांना ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झाला आहे. हे चार रुग्ण यापूर्वी नायजेरीतून आलेल्या प्रवाशांच्या सहवासातील आहे.

शहरातील रुग्णसंख्या दहावर गेली. त्यातील चार कोरोनामुक्त झाले आहेत. सहा रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, महाराष्ट्रात एकूण सात रुग्ण आज सापडले आहेत. ‘ओमायक्रॉन’ची लागण झालेल्या सहा रुग्णांची दहाव्या दिवशी कोरोना तपासणी करण्यात आली आहे.

यातील चार रुग्णांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या चारही रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर इतर दोन जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे.

या रुग्णांच्या संपर्कातील 22 रुग्णांपैकी 19 रुग्णांना नवीन भोसरी रुग्णालयात दाखल आहेत. तर तीन रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या 22 रुग्णांचे ‘ओमायक्रॉन’चा जिनोम सिकव्हेंसिंग तपासणीचे नमुने एनआयव्ही पुणे कडे पाठविण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button