breaking-newsताज्या घडामोडी

गंगाखेड येथे तरुणावर चाकू हल्ला; एक ठार, दोन जखमी

गंगाखेड | गंगाखेड शहरातील राजीव गांधी नगरमध्ये शुल्लक कारणावरून एका तरुणाची गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली आहे. तर, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पाच हल्लेखोरांना रात्री उशिरा अटक करण्यात आली असून शहरात तणावाचे वातावरण आहे.

शहरातील राजीव गांधी नगरमध्ये गुरुवारी (३० एप्रिल) रात्री आठचा सुमारास मयत शे. गौस शे. नजीर हा आपल्या चारचाकी वाहनासह थांबला होता. त्यावेळी आरोपी भैया रोहिदास जाधव याची दुचाकी चारचाकी वाहनास घासल्यानं वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. वादात मध्यस्थी करणारे मयत शे. गौस याचे दोन मित्र स. मुजमिल स. दाऊद व कलीम पठाण यांना भैय्या जाधवचे साथीदार संजय लक्ष्मण पारवे, शैलेश संजय लोंढे, शे. अकबर शे. दिलावर, बबन पंडित यांनी लोखंडी रॉडनं मारहाण सुरू केली. यात शे. गौस याच्या गळ्यासह डोक्यावर, नाकावर चाकूचा जबर मार बसला. मुजमिल दाऊद आणि कलीम पठाण दोघेही गंभीर जखमी झाले. गौस रक्ताच्या थारोळ्यात पडताच पाचही हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

तिघांनाही जखमी अवस्थेत उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही वार्ता शहरात पसरताच लोकांनी उपजिल्हा रूग्णालय परिसरात धाव घेतली. जमाव एकत्र झाल्याने संचारबंदी, जमावबंदीचे तीन तेरा वाजले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पोलिस प्रशासनाने बळाचा वापर करीत जमावास पांगवले. गौस याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. जखमी स. मुजमील व कलीम पठाण यांचावर उपचार करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button