breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

अंधश्रद्धेचा कहर! लिंबू आणि कुंकवाचा प्रसाद खाल्ल्याने तब्बल २० जणांना करोनाची लागण

सध्या राज्यभरात कोरोनाची वाढत चाललेली गंभीर परिस्थिती पाहता कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक हवे ते उपचार करायला तयार आहेत, जे काही उपचार सोशल मिडियावर आणि बातम्यांच्या माध्यमातून समोर येतील ते उपचार लोक करत आहे.त्यात मग अंधश्रद्धेला माननारे लोक कसे मागे पडतील. अंधश्रद्धेला दुजोरा देणाऱ्या लोकांचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लातूरमध्ये हा अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदूबाबाने दिलेला लिंबू आणि कुंकूचा प्रसाद खाल्ल्याने तब्बल २० जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली असून या भोंदूबाबावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

औसा तालुक्यातील सारोळा गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवीची परडी भरण्याच्या कार्यक्रमासाठी गावातील काही लोक एका आराद्याकडे गेले होते. हा आरादी गावचाच रहिवासी आहे. हा आरादी गावातील एका करोनाबाधिताच्या संपर्कात आला होता. त्याने लिंबू आणि कुंकवावर फुंकर मारून हा प्रसाद गावातील अनेकांना खायला दिला. त्यामुळे अनेकांनी हा प्रसाद खाल्ला होता. दोन दिवसानंतर आजारी पडलेल्या या आराद्याचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची करोना चाचणी करण्यात आली असता २० जणांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे हे २०ही लोक तीन कुटुंबातील असल्याचं म्हटलं जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच सारोळा गावात एकच खळबळ उडाली असून गावच्या पोलीस पाटलाने आराद्याविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या आराद्याविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. तसेच या घटनेनंतर या २० करोनाबाधितांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच हे २० जण गावातील कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button