breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांचा 5 हजारचा टप्पा पार, 72 जणांचा मृत्यू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधीत रुग्णांचा 5 हजाराचा टप्पा पूर्ण झाला आहे. तर, आजअखेर 72 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दररोज 350च्या पुढे रुग्ण पॉझीटिव्ह आढळत आहेत. कोरोना विषाणुचा नागरिकांनी धसका घेतला आहे. ही रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आजपर्यंत 5 हजार 203 नागरिकांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाला. त्यातील 3 हजार 377 नागरिकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. आजअखेर कोरोनाशी झुंज देत असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 981 एवढी आहे. या रुग्णांवर वायसीएम रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयातही उपचार दिले जात आहेत.

आजपर्यंत बाहेरून प्रवास करत पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या रुग्णांची संख्या 29 हजार 924 एवढी आहे. दररोज शहरात दाखल होणा-या नागरिकांची नोंद केली जात आहे. तसेच, त्यांनी क्वारंटाईन होण्याच्या सूचना देखील दिल्या जात आहेत. त्यातच 29 हजार 50 नागरिकांना संशयीत रुग्ण म्हणून अलगीकृत करण्यात आले होते. त्यातील 21 हजार 910 जणांचा रिपोर्ट निगेटिव्हि आला आहे. एकूण 26 हजार 67 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर, 5 हजार 203 रुग्णांपैकी आजअखेर 3 हजार 377 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून कोरोना विषाणुला अटोक्यात आणण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शहराच्या ज्या भागात सर्वाधीक कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आहे. त्या भागाला कंन्टेन्मेंट झोन म्हणून घोषीत केले आहे. तेथील नागरिकांचा दैनंदीन सर्वे केला जात आहे. पालिकेच्या अधिका-यांनी आजपर्यंत 30 हजार 278 घरांना भेटी दिल्या आहेत. तर, 95 हजार 47 नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या तपासणीबाबत विचारणा करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button