breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बुद्ध विहारातील भन्ते आणि भिक्षुणिंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी|

सध्या मुंबई आणि पुण्य़ातील कोरोनाची परिस्थिती पाहिली असता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याच पार्श्वभुमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्रच्या वतीने पिंपरी-चिंचवड भागातील बुद्ध विहारातील भन्ते आणि भिक्षुणिंना आषाढी बुद्ध पोर्णिमे निमित्त जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

आषाढी बुद्द पोर्णिमेला बौद्ध धर्मात विशेष महत्त्व असतं.गौतम बुद्धांनी वर्षावासाला विशेष स्थान दिलं आहे.वर्षावासाचा कार्यकाळ आषाढी बुद्ध पोर्णिमेनंतर पुढील तीन महिन्यांपर्यंत असतो. यादरम्यान भंते,भिक्षुणी, उपासिका ईत्यादी बुद्ध विहारातच राहतात आणि प्रवचन देतात.मात्र आता या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सध्या बौद्ध भन्ते -भिक्षुणींनी ऑनलाईनच प्रवचन देण्याचा मार्ग निवडला आहे.वर्षावासा दरम्यान जिवनावश्यक वस्तूंची त्यांना गरज भासते.म्हणूनच आषाढी बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्रचे सचिव रमेश चिमुरकर आणि पदाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड पुणे या परिसरातील विविध बुद्ध विहारांना जिवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप केलं.

या जिवनावश्यक गोष्टींमध्ये गहू,तांदूळ,गोडेतेलं, रवा, साबण,मुख्य म्हणजे सॅनिटायझर,आणि मास्क,अशा अनेक वस्तूंचे किट त्यांना देण्यात आले.या वस्तूंच्या वाटप करण्यात आलेला हा उपक्रम नक्कीच बुद्ध विहारात राहणाऱ्या भंते,भिक्षुणी, उपासिकांसाठी महत्त्वाचा उपक्रम ठरणारा आहे.यामुळे त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न नक्कीच मार्गी लागणार आहे.एवढच नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्रचे सचिव रमेश चिमुरकर यांनी असे सामाजिक उपक्रम प्रत्येक धार्मिक स्थळी राबवावेत असं आवाहनही केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button