breaking-newsराष्ट्रिय

नीट, जेईई परीक्षेच्या विरोधात काँग्रेसचे उद्या देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकट काळात नीट आणि जेईई या परीक्षा घेण्याच्या विरोधात काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष उद्या शुक्रवारी देशभर आंदोलन करणार आहेत. सध्याच्या या बिकट परिस्थितीत परीक्षा घेऊन मुला-मुलींना संकटात ढकलू नये, या मागणीसाठी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष उद्या सकाळी ११ वाजल्यापासून राज्यातील आणि जिल्ह्यांतील सरकारी कार्यालयांसमोर निदर्शने करणार आहेत.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत काल विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत परीक्षांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार उद्या हे आंदोलन केले जाणार आहे. कोरोनाच्या संक्रमणात मुलांचा जीव धोक्यात घालू नये, या मागणीसाठी सर्व विरोधी पक्ष एकजुटीने रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. कोरोनाच्या काळात परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ होईल. याशिवाय आसाम आणि बिहारसारख्या राज्यांमधील परिस्थिती त्यामुळे आणखी बिघडेल, अशी भीती वेणुगोपाल यांनी व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग उपस्थित होते. त्यांनी आणि आम आदमी व डीएमके यांनीही या परीक्षांना विरोध केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button