breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अंगातील भुत काढण्यासाठी सुनेला पाजले गुंगीचे औषध

पिंपरी ( महा ई न्यूज ) – अंगातील भुत काढण्यासाठी सासरकडच्या मंडळींनी ३० वर्षीय सुनेला मारहाण करुन गुंगीचे औषध पाजल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे सासरकडच्यांनी या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आसल्याचे म्हणने सुनेचे आहे.

याप्रकरणी पीडित सुनेने सासरकडच्या मंडळींविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित सुन ही चिंचवडमधील गांधी पेठ येथे पतीसह राहण्यास होती. त्यांच्यासोबत सासू, सासरे, दिर, जाऊ हे देखील राहण्यास होते. तर नणंद मुंबईमधून चिंचवड येथे आली होती. या सर्वांनी मिळवून अंधश्रद्धेपोटी अंगातील भूत पळवून लावण्यासाठी ३० वर्षीय सुनेला मारहाण करत गुंगीचे औषध पाजले. याचा त्यांनी व्हिडिओ देखील तयार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

माझी माहेरची स्थिती गरीब असून सासरच्यांनी माझ्या कुटुंबीयांकडून वारंवार पैसे घेतले. तसेच माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती परवेश शहा, सासरे बाबूमिया शहा, सासू, दिर शबाब बाबूमिया शहा, जाऊ सना शहा आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button