breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गोपीनाथ मुंडे यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले, पिंपळे गुरवमध्ये भावपूर्ण श्रध्दांजली

  • भाजप कार्यकर्ते अरुण पवार यांचे प्रतिपादन
  • विविध संघटनांच्या मान्यवरांची होती उपस्थिती

पिंपरी, (महाईन्यूज) – महाराष्ट्राला प्रगतीची दिशा देण्यात स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात त्यांचे कर्तृत्व गाजले आहे. मुंडे साहेबांनी तन-मन-धन अर्पण करून देशाची सेवा केली, असे प्रतिपादन मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी व्यक्त केले.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठवाडा जनविकास संघ (महा . राज्य) संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी-चिंचवड आणि पुणे पदाधिकारी यांच्या वतीने पिंपळे गुरव येथील त्यांच्या कार्यालयात मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे खजिनदार दत्तात्रय धोंडगे, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी रबडसे, जय भगवान संघाचे अध्यक्ष धराडे, ह्युमन राईटसचे सदस्य सुनील काकडे, प्रबोधनकार शारदा मुंडे, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य महादेव पाटेकर, बिरू व्हनमाने, महादेव बनसोडे, भरत शिंगोटे, युवराज नलावडे, विजय वडमारे, मिनाक्षी खैरनार, सुनंदा भोज, मारुती बानेवर, शंकर तांबे, बळीराम माळी, संदिप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले की, मराठवाड्याच्या मातीतील सळसळत्या रक्तामध्ये ज्या लोकनेत्याचा जन्म झाला, ते म्हणजे गोपीनाथ मुंडे आहेत. दुधात साखर विरघळावी असा त्यांचा स्वभाव सर्वांना परिचित आहे. गोपीनाथ हे नावाप्रमाणेच अनाथांचे नाथ होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर लोकांसाठी संघर्ष केला. केंद्रात मंत्री पद भूषवून देशाचे काम केले असले तरी त्यांनी सर्वाधिक वेळ हा महाराष्ट्रासाठीच दिला. सदैव महाराष्ट्रातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवणारा हा एकमेव नेता होऊन गेला, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.

संघाचे सचिव सूर्यकांत कुलकर यांनी कार्यक्रमास आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button