breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य शाळेच्या पहिल्याच दिवशी द्या, महापौरांच्या सूचना

पिंपरी, (महाईन्यूज) – राज्य सरकारच्या नियोजन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार डीबीटी प्रक्रियेतून गणवेश हा कायमस्वरूपी वगळण्यात आला आहे. त्याआधारे शाळेच्या पहिल्या दिवशी महापालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पी. टी. गणवेश आणि स्वेटर्सचे त्वरित वितरण करावे, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केल्या आहेत.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात महापौर जाधव यांनी म्हटले आहे की, “केंद्राच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश योजनेअंतर्गत पात्र शालेय विद्यार्थ्यांना गणवेश संच उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्यात येत होती. मात्र, बँकांच्या कडक नियमांमुळे विद्यार्थ्यांची खाती उघडण्यात आली नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने डीबीटी प्रक्रियेतून गणवेश वगळला आहे. आणि मुद्रांक शुल्क भरून नऊ वर्षाच्या करारानुसार गणवेश, पी. टी. गणवेश आणि स्वेटर्स, कौशल्य प्रकाशनाची विविध अभ्यास पुस्तके तयार आहेत. त्यास स्थायी समितीची वित्तीय मान्यता देखील मिळालेली आहे. त्यामुळे येत्या 17 जून रोजी शाळा सुरू होत आहेत, या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना उपलब्ध साहित्य वाटप करणे आवश्‍यक आहे.

याबाबत महापौर कार्यालयाकडे मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक साहित्य वेळेत मिळावे, यासाठी विविध सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांची मागणी आहे. प्राप्त माहितीनुसार अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे यांच्या मान्यतेनुसार पुढील सहा वर्षाकरिता निविदा अटी शर्तीनुसार व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यानुसार करारनामा करून पुरवठा आदेश दिला आहे. त्यानुसार साहित्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे नऊ वर्षासाठी करण्यात आलेल्या करारनामे व पुरवठा आदेश रद्द न करता शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना साहित्य मिळेल, याची कार्यवाही करणे आवश्‍यक आहे.”, अशा सूचना महापौर जाधव यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button