breaking-newsराष्ट्रिय

हिंदू व्यक्तीला रक्त देण्यासाठी त्याने सोडला ‘रोजा’

उत्तराखंड : जात, धर्म, पंथ, वर्ण या साऱ्या सीमांचे उल्लंघन करत देशातील एकतेचं सुरेख दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. जिथे धर्माचं राजकारण करत देशाचं विभाजन करण्याची रणनिती आखली जात आहे, तिथेच देशाचे नागरिक मात्र विविध मार्गांनी त्यांच्यात असणारी एकतेची भावना सर्वांसमोर मांडत एक वेगळाच आदर्श घालत आहेत.

उत्तराखंडच्या २० वर्षीय अजय बिलावलम या युवकाला कुष्टरोगाचं निदान झालं. त्याच्या रक्तातील पेशींचं प्रमाण झपाट्याने घटण्यास सुरुवात झाली. हे प्रमाण इतक्या पातळीपर्यंत घटलं की त्याच्या जीवाला धोकाच निर्माण झाला. या साऱ्यामध्ये एका मुस्लिम व्यक्तीने त्याची मदत केली. अजयला A+ या रक्तगटातील रक्ताची गरज होती. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून त्याच्या वडिलांनी सोशल मीडियाचा आधार घेत मित्र आणि ओळखीच्यांकडून रक्ताची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. एका भावनिक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी इतरांना रक्तदानाचं आवाहन केलं. पोस्ट वाचून आरिफ खान या तरुणाने रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. नॅशनल असोसिएशन ऑफ पॅरेंट्स अँड स्टुडंट्स राइट्सच्या अध्यक्षपदी असणाऱ्या आरिफने अजयच्या वडिलांना फोन करून रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली.

आरिफ रक्तदान करण्यासाठी रुग्णालयात गेला तेव्हा डॉक्टरांनी त्याला काहीतरी खाण्याचा सल्ला दिला. पण, पवित्र रमजान महिना सुरु असल्यामुळे आरिफने रोजा ठेवला होता. ज्यामुळे आपण काही न खाता रक्तदान केले तर चालेल का, अशी विचारणा त्याने केली. डॉक्टरांनी असं करण्यास नकार दिला. पण, आपल्या उपवासापुढे एखाद्याचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, कारण ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ आहे, याच विचाराने आरिफने त्याचा रोजा सोडला आणि रक्तदान केलं. रोजा सोडून अजयच्या मदतीसाठी पुढे गेलेल्या आरिफचं सगळीकडून कौतुक होतं आहे. अजयचं आयुष्य किती वाढेल हे ठावूक नसलं तरी कुष्ठरोगाशी लढण्यासाठी काहीसा जास्त वेळ आरिफच्या रक्ताने त्याला मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button