breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

राजकीय सभ्यता जपणारा मावळा….!

भोसरी | महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला. खासदार डॉ. अमोल कोल्हे आज भोसरी विधानसभेतील इंद्रायणीनगर भागात गाव भेट दौऱ्यावर होते. यावेळी निओ रिगल सोसायटीत मतदारांना भेटत असताना त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.

खासदार कोल्हे यांच्या स्वागतानंतर सोसायटीतील रहिवासी आपल मनोगत मांडत होते. त्याच वेळी एका जेष्ठ नागरिकाने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. आपल्या मनातील खदखद व्यक्त करत असताना या जेष्ठ नागरिकाने माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दलची नाराजी तीव्र शब्दात व्यक्त करायला सुरुवात केली. त्यांच वेळी भाषेतील कडवटपणा लक्षात येताच, डॉ. कोल्हे यांनी तात्काळ त्यांना थांबवलं आणि माईक आपल्या हातात घेतला.

हेही वाचा      –    ज्येष्ठ नागरिकांबरोबर कॅरम खेळत खासदार बारणे यांचा प्रचारात ‘विरंगुळा’ 

शरद पवार यांची साथ सोडून गेलेल्यांमुळे सर्वानाच मनस्ताप झाला, हे खरं असलं तरी टीका करताना आपण राजकीय आपली राजकीय सभ्यता सोडायची नाही, असं आवाहन केलं. समोरुन राजकारणाचा स्तर घसरला असला तरी आपण आपला स्तर घसरु द्यायचा नाही, अस हात जोडून आवाहन डॉ. कोल्हे यांनी मतदारांना केलं.

डॉ. कोल्हे यांनी दाखवलेल्या सुसंस्कृतपणाबद्दल मतदारांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं. शिवनेरी किल्ल्यावरही डॉ. कोल्हे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट झाली असता, डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या वयाचा मान राखत त्यांच्या पाया पडून नमस्कार केला होता. डॉ. कोल्हे यांच्या याच सुसंस्कृतपणाचा अनुभव आज मोशीतील मतदारांनी देखील घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button