breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोण होणार ‘महापाैर’, पिंपरीच्या सत्तारुढ पक्षनेत्यांच्या बैठकीत खलबते

पिंपरी |महाईन्यूज|

राज्यातील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जाहीर झाली. पिंपरी-चिंचवड भाजपमधील इच्छुकांच्या आकांक्षांना पुन्हा धुमारे फुटले असून, पुन्हा गटातटांच्या राजकारणाला वेग आला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक आज (गुरुवारी) बोलविली आहे. यामध्ये महापाैर पदासाठी इच्छुकांच्या नावे स्विकारुन त्या नावाची शिफारस वरिष्ठ पातळीवर होणार आहे. नगरसेवकांचा कल पाहून एकदंरित निर्णय होणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिले अडीच वर्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या गटाला संधी मिळाली. त्यामुळे आता पुढील अडीच वर्ष चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाला संधी मिळणार आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे.

आता विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत अनेकांनी भाजप विरोधात काम केले. पक्षाशी एकनिष्ठ असणा-या, पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणा-या संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातच पिंपरी चिंचवडचे महापाैर पद हे महिला खुला प्रवर्ग या राखीव आहे. त्यामुळे आपल्या, गॉडफादरचे निष्ठावंत असे वेगवेगळे मुद्दे पुढे करून आपापले घोडे पुढे दामटण्याचे प्रकार आताच सुरू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापाैर पदासाठी चिंचवडमधूनही नव्या की जून्या चेह-याला संधी मिळणार, याबाबत चित्र शनिवारी (दि.14) स्पष्ट होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button