breaking-newsराष्ट्रिय
यासीन मलिक ताब्यात; तर मिरवैझ नजरकैदेत

श्रीनगर – जम्मू-काश्मीर पोलिसांनी आज सावधगिरीचा उपाय म्हणून विभाजनवादी नेत्यांवर निर्बंधात्मक कारवाई केली. त्यानुसार जेकेएलएफचा अध्यक्ष मोहम्मद यासीन मलिक याला ताब्यात घेण्यात आले. तर हुर्रियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचा अध्यक्ष मिरवैझ उमर फारूक याला त्याच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आले.
सीआरपीएफ वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या काही नागरिकांचे निधन झाल्याने काश्मीर खोऱ्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. यापार्श्वभूमीवर, विभाजनवादी नेत्यांनी निषेध मोर्चे काढून वातावरण आणखी बिघडू नये यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर निर्बंधात्मक कारवाई केली. हुर्रियत कॉन्फरन्सच्या जहाल गटाचे नेते सैद अली शाह गिलानी आधीपासूनच त्यांच्या घरात नजरकैदेत आहेत. दरम्यान, विभाजनवादी नेत्यांनी आज काश्मीर खोऱ्यात बंदचे आवाहन केले होते.