breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईकरांना खुशखबर, ऑगस्टमध्ये ‘म्हाडा’च्या लॉटरीचा मुहूर्त ठरला !

मुंबई : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना एका आनंदाची बातमी आहे. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हाडा जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी एकूण एक हजार घरांसाठी ही जाहिरत असेल. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर, साधारण दीड महिन्यानंतर म्हणजे आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सोडत काढण्यात येईल.

अत्यल्प उत्पन्न गटासाठी 800 आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 200 घरे असतील, अशी माहिती मिळते आहे. म्हाडाच्या या नव्या घरांच्या किंमती अद्याप ठरल्या नाहीत. यावर अंतिम निर्णयाची सध्या प्रक्रिया सुरु आहे. बोरीवलीतील महावीरनगर, गोरेगाव, विक्रोळीमधील कन्नमवारनगर, घाटकोपरमधील पंतनगर, अ‍ॅण्टॉप हिल, मुलुंडमधील गव्हाणपाडा, मानखुर्द या ठिकाणी यंदा म्हाडाची घरे उपलब्ध असतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button