breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेनेने राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत असतानाच नाराज झालेल्या डॉ. सावंत यांनी आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला.

राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री असलेले डॉ. सावंत तीन वेळा विधान परिषदेवर निवडून आले आहेत. शिवसेनेने विधान परिषदेतील सुभाष देसाई, दिवाकर रावते तसेच डॉ. सावंत अशा तीन आमदारांना मंत्रिपदे दिल्याने विधानसभेतील ज्येष्ठ आमदारांनी गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजीचा सूर आळवला होता. परिषदेतील मंत्री काम करीत नसल्याचाही त्यांनी आक्षेप नोंदवला होता. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका पाहता शिवसेना नेतृत्वालाही काही बदल करायचे होते. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. सावंत यांच्याऐवजी पोतनीस यांना उमेदवारी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे कळते.

दरम्यान, डॉ. सावंत यांचा राजीनामा उद्धव यांनी स्वीकारला नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही राजीनामा पाठवला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबण्यास सांगितले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button