breaking-newsराष्ट्रिय
माऊंट देवतिब्बा मोहीमेला सुरुवात

नवी दिल्ली – समुद्रसपाटीपासून 6001 मीटर्स उंचीवर असणाऱ्या हिमाचल प्रदेशातल्या देवतिब्बा शिखरासाठी केवळ महिला गिर्यारोहकांचा समावेश असणारी मोहीम भारतीय नौदलाने आयोजित केली आहे.
आजपासून सुरु झालेली ही मोहिम ते 15 जून या कालावधीत होणार आहे. या मोहिमेला व्हाईस ऍडमिरल ए. के. चावला 28 मे 2018 रोजी नवी दिल्लीत हिरवा झेंडा दाखवला. लेफ्टनंट कमांडर कोकिळा सजवन या मोहिमेचे नेतृत्व करत असून यात 15 सदस्य आहेत. सागर परिक्रमा या संपूर्ण महिला नाविकांच्या यशस्वी पृथ्वी प्रदक्षिणा मोहिमेनंतर ही देवतिब्बा मोहीम हाती घेण्यात आली आहे.