breaking-newsराष्ट्रिय

राष्ट्रपती भवनातील बंद खोलीत सापडला मृतदेह

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील कर्मचारी वसतिगृहातील एका खोलीत गुरुवारी रात्री मृतदेह सापडला. वसतिगृहातील एका खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर लगेचच शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तिथे एका पुरुषाचा मृतदेह सापडला.

मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्रिलोकचंद असे त्याचे नाव आहे. राष्ट्रपती भवनातील सचिवालयात तो काम करत होता. मागच्या काही दिवसांपासून त्रिलोकचंद आजारी होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. ह्दयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असावा असे पोलिसांचे मत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

चार ते पाच दिवसांपूर्वी त्रिलोकचंदचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला त्यावेळी तो अत्यंत वाईट स्थितीत होता. त्रिलोकचंदला पत्नी, एक मुलगा आणि वृद्ध आई आहे. त्रिलोकचंद गांधीनगर येथे राहायला होता. शेजाऱ्यांना वाटले कि, तो पुन्हा गांधीनगरला निघून गेला. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास त्याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button