breaking-newsमुंबईराष्ट्रिय

उद्या पावसामुळे इव्हीएममध्ये बिघाड झाला म्हणतील- अखिलेश यादव

मुंबई : पालघर, भंडारा-गोंदिया तसेच उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा आणि नूरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी अनेक ठिकाणी इव्हीएममध्ये बंद पडल्याच्या तक्रारी आल्या. यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कडक उन्हामुळे इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्याचा अखिलेश यांनी समाचार घेतला आहे.

‘आज उन्हामुळे इव्हीएम काम करत नसल्याचे सांगितले जात आहे. उद्या म्हणतील पावसामुळे आणि थंडीमुळे असे होत आहे. काही लोक जनतेला रांगेत उभा करून आपल्या सत्तेची ताकद दाखवू इच्छितात. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी आम्ही पुन्हा करत आहेत’, असे ट्विट करत अखिलेश यांनी भाजपावरही टीका केली आहे.

Akhilesh Yadav

@yadavakhilesh

आज कहा जा रहा है कि गर्मी के कारण EVM मशीन काम नहीं कर रही है, कल कहेंगे बारिश और ठंड की वजह से ऐसा हो रहा है. कुछ लोग जनता को लाइन में खड़ा रखकर अपनी सत्ता की हनक दिखाना चाहते हैं. हम पेपर बैलेट वोटिंग की माँग को एक बार फिर दोहराते हैं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button