breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

भिमाकोरेगाव विजयस्तंभा साठी दिलेल्या निधीमुळे आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण : डॉ. कैलास कदम

  • भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण- राहुल डंबाळे

पिंपरी | प्रतिनिधी 

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मुंबईतील इंदू मिल येथे होणा-या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आणि त्या जागेबाबत इतिहासीक निर्णय घेतला. देशातील सर्व आंबेडकरी अनुयायांना कॉंग्रेस नेहमीच न्याय देण्याची भुमिका घेत असते. भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभासाठी देखील महाविकास आघाडी सरकारने भरघोस निधी जाहिर केला आहे. हा दिवस आंबेडकरी जनतेसाठी आनंदोत्सव साजरा करण्याचा आहे. म्हणून आज शहर कॉंग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करीत आहोत. यासाठी भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाले यांनी पाठपुरावा केला त्यांचाही उचित गौरव शहर कॉंग्रेसच्या वतीने करताना मला अभिमान वाटत आहे.

तसेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधीमंडळातील कॉंग्रेसचे गटनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचेही अभिनंदन करीत आहोत. या निर्णयामुळे राज्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे प्रतिपादन असे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभ आणि परिसर विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यातील तीस कोटी रुपयांचा निधी पायाभूत सेवासूविधांसाठी उपलब्ध करुन दिला. यासाठी आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते राहुल डंबाळे यांनी पाठपूरावा केला. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने डंबाळे यांचा शुक्रवारी पिंपरीत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते शाल, पुष्पगूच्छ देऊन आणि पेढे वाटून सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी डंबाळे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देऊन सन्मानित केले. राष्ट्रवादी प्रवक्ते फझल शेख, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे तसेच बाबा कांबळे, सुवर्णा डंबाळे, नितीन धोत्रे, गोपाळ मोरे, गंगाताई धेंडे, कविता खराडे, मनिषा गटकळ, सारीका पवार, आशा शिंदे, विमल गायकवाड आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी देखील महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन केले. यावेळी भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाले सांगितले की, पुणे- भिमाकोरेगांव शौर्य दिन कार्यक्रम 1 जानेवारी 2022 रोजी मोठया संख्येने साजरा होणार असून याठिकाणी अभिवादनासाठी येणाऱ्या भिम अनुयायांना सर्व प्रकारच्या पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू झालेली आहे.

यंदाच्या वर्षी भिमाकोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करणेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना समन्वय समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, उर्जामंत्री नितिन राऊत, माजी मंत्री प्रा. जोगेंद्र कवाडे तसेच आनंदराज आंबेडकर यांच्यासह इतर अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. उत्सवाच्या तयारीसाठी भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती व जिल्हा प्रशासनाच्यावतीने बैठका घेण्यात आल्या होत्या.

गुरुवारी या संदर्भामध्ये जिल्हा परिषद पुणे येथे तहसिलदार व सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे समवेत इतर सर्व विभागाच्या अधिका-यांशी व आंबेडकर समाजातील पक्ष संघटनांशी संयुक्त बैठक झाली. यात जिल्हा प्रशासनाने सदर ठिकाणी संरक्षण, पिण्याचे पाणी, वाहतुकीची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था इत्यादी प्रकारच्या पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. दरम्यान यंदाच्यावर्षी सर्व राजकीय पक्षाच्या अभिवादन सभा आंबेडकरी साहित्य विक्रीचे स्टॉल याचा देखील कार्यक्रमात समावेश राहणार आहे. दरम्यान भिमाकोरेगांव विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक व्हावे याबाबतची घोषणा शासनाच्यावतीने करण्यात आली असुन त्यासाठी तब्बल १०० कोटींचा बृहत आराखडा तयार करण्याच्या हालचाली सुरु असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या बद्दल आम्ही राज्य सरकार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष आभार मानत आहोत. या उत्सवात नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button