भारत दौरा अर्धवट सोडून नेदर्लंडचे पंतप्रधान मायदेशी रवाना

नवी दिल्ली – नेदर्लंडचे पंतप्रधान मार्क रूट आपला भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी रवाना झाले आहेत. गुरुवारी रात्री ते नेदर्लंडला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ते दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते.
काही अंतर्गत कारणांसाठी पंतप्रधान मार्क रूट यांना भारत दौरा अपूर्ण ठेवून तातडीने मायदेशी जावे लागले असल्याची माहिती त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. गुरुवारीच भारतात आलेल्या पंतप्रधान मार्क रूट यांचा गुरुवारी रात्री बेंगळुरूला जाण्याचा कार्यक्रम होता. सन 2014 मध्ये एमएच -17 हे विमान युक्रेनवर पाडण्यात आले होते. त्यासंबंधात मंत्रिमंडळाची एक तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यासाठीच मार्क रूट यांना परत जावे लागले आहे. या बैठकीत नेदर्लॅंड आणि अन्य देशांच्या तपासणी दलाच्या अहवालावर चर्चा होणार आहे.
17 जुलै 2014 रोजी एमएच-17 विमान पाडण्यासाठी रशियन क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याचा दवा मार्क रूट यांनी केला होता. या विमानातील सर्वच्या सर्व, 298 प्रवासी मारले गेले होते.