Mahaenews

भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्रींचे वर्षाचे मानधन फक्त ७ कोटी!

Share On

नवी दिल्ली: फलंदाजी व गोलंदाजीसाठी दोन स्वतंत्र प्रशिक्षक नेमून बीसीसीआयनं भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे पंख कापल्याची चर्चा असली तरी शास्त्रींच्या मानधनावर याचा काहीही परिणाम झालेला नाही. संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांना वर्षाला ७ कोटींहून अधिक रुपयांचं पॅकेज दिलं जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतं.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) शास्त्रींना तशी ऑफर दिली आहे. अनिल कुंबळे यानं प्रशिक्षकपदासाठी साधारण इतक्याच रकमेची मागणी केली होती. बीसीसीआयनं काही प्रमाणात त्या मागणीची दखल घेत शास्त्रींना ७ कोटींचं पॅकेज देण्याचं ठरवल्याचं समजतं. मात्र, ही रक्कम साडेसात कोटींपेक्षा अधिक नसेल, असंही मंडळाच्या एका पदाधिकाऱ्यानं टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.
शास्त्रींसोबत फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रशिक्षकांचं वार्षिक मानधन २ कोटींपर्यंत असेल, असंही सांगितलं जात आहे. या संदर्भातील करारांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Exit mobile version