नानासाहेब महाडिक यांचे हृदयविकाराने निधन

सांगली – ज्येष्ठ नेते, उद्योगपती, वनश्री नानासाहेब महाडिक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ते ६२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
वाळवा तालुका आणि पेठ परिसरातील सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात महाडिक यांनी मोलाची कामगिरी केली आहे. येथील विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.
सध्या इस्लामपूर नगरपालिकेत आणि सांगली जिल्हा परिषदेत महाडिक गटाच्या पाठिंब्यावरच भाजपला सत्ता मिळवता आली आहे. नाना महाडिक यांची मुलगी रोहिनी पाटील या सांगली महापालिकेत विद्यमान नगरसेविका आहेत. तर, मुलगा सम्राट आणि राहुल हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.
माजी मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक अशी नानासाहेब महाडिक यांची ओळख होती. प्रखर विरोध असतानाही नाना महाडिक यांनी वाळवा आणि शिराळा तालुक्यात स्वतःचे राजकीय अस्तित्त्व आणि आपला गट निर्माण केला.