breaking-newsआंतरराष्टीय

‘ट्रम्प यांनी निमंत्रण नाकारणं हे मोदी सरकारचं अपयश’

राजधानीत २६ जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात सहभागी होण्यासाठी भारताने दिलेले निमंत्रण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारल्यानंतर आता काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य आनंद शर्मा यांनी यावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. ट्रम्प यांनी निमंत्रण नाकारणे हे मोदी सरकारचे अपयश असल्याचे ते म्हणाले.

ANI

@ANI

It is a diplomatic faux pas and an avoidable embarrassment. There was no justification to have extended the invitation without first ascertaining that US President Trump will accept it. It is a failure of Indian diplomacy, they should have avoided it: Anand Sharma, Congress

ट्रम्प यांनी निमंत्रण नाकारल्यामुळे भारताची फजिती झाली आहे. ट्रम्प यांच्याकडून निमंत्रण स्वीकारलं जाईल याची खातरजमा करून मगच निमंत्रण द्यायला हवं होतं. हे राजकीय धोरणाचं अपयश आहे. ही फजिती सरकारनं टाळायला हवी होती.

दरम्यान, ट्रम्प यांच्या कार्यालयाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना पत्र पाठवून हे निमंत्रण स्वीकारता येणे शक्य नसल्याचे कळवले आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या या पत्रात, ट्रम्प यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

२६ जानेवारीच्या आसपास अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये ट्रम्प जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्यांना भारतातील कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button