breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे नाना पटोले यांना जोडे मारा आंदोलन

  • शहर भाजपाकडून आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध
  • मोरवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयासमोर घोषणाबाजी

पिंपरी । प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. तसेच, पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

मोरवाडी येथील पिंपरी-चिंचवड भाजपा जनसंपर्क कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, स्वीकृत नगरसेवक बाबू नायर आदी उपस्थित होते. मुर्दाबाद…मुर्दाबाद.. नाना पटोले मुर्दाबाद… अशा घोषणा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या.

भंडारा येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. ‘‘आपण मोदीला मारुही शकतो व शिव्याही देवू शकतो…’’ असे वादग्रस्त विधान केल्यामुळे पटोले यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात भाजपाकडून संताप व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button