कर्नाटक : घटनाक्रम…
7.50 AM मुख्यमंत्री येडियुरप्पा पक्षाच्या विधीमंडळ बैठकीसाठी रवाना.
8.53 AM जेडीएसचे आमदार बंगळुरुतील हॉटेलवर दाखल.
10.00 AM माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांचे विधानभवनात आगमन.
10.15 AM बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर मंगलोरमध्ये जमावबंदी आदेश.
10.24 AM कॉंग्रेस आमदार विधानसभेकडे रवाना.
10.35 AM ज्येष्ठता डावलून हंगामी अध्यक्षपदी निवड झालेल्या के जी बोपय्यांना विरोध सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु.
11.00 AM – मुख्यमंत्री येडियुरप्पांसह कर्नाटकातील आमदार विधानसभेत दाखल
11.12 AM सुप्रीम कोर्टाने कॉंग्रेस-जेडीएसची मागणी अमान्य, हंगामी अध्यक्ष भाजपचेच
11. 12 AM सभागृहात आमदारांचा शपथविधी सुरु
11.51 AM – शपथविधीला कॉंग्रेसच्या 1 आणि जेडीएसच्या 2 आमदारांची गैरहजेरी.
12.11 PM- कर्नाटक विधानसभेत एकूण 218 आमदार उपस्थित
12.40PM – आतापर्यंत 70 आमदारांचे शपथविधी पूर्ण
12.43PM – कॉंग्रेस-जेडीएसचे सहा आमदार गायब
01.03PM – येडियुरप्पांच्या मुलाने आमच्या दोन आमदारांना हॉटेलमध्ये कैद करुन ठेवल्याच कॉंग्रेसचा आरोप
01.11 PM- कॉंग्रेस आमदाराशी बोलताना येडियुरप्पांची ऑडिओ क्लिप कॉंग्रेसकडून जारी
1.20 PM येडियुरप्पांच्या मुलाने बंगळुरुतील हॉटेलवर दोन आमदारांना डांबून ठेवलं, कॉंग्रेसचा आरोप
2.30 PM येडियुरप्पा आणि भाजप नेत्यांची तातडीची बैठक
3.30 PM विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात.
3.44 PM विधानसभेत येडियुरप्पा यांच्या भाषणाला सुरुवात
3.46 PM भाजपकडून बहुमताचा प्रस्ताव सादर
4.00 PM येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा