breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

कोवळ्या वयातील मुले आणि मुली दोघेही सुरक्षित नसल्याचे चित्र समोर येत आहे. मानसिक विकृती बळावत चालली आहे. असाच एक प्रकार तळेगाव दाभाडे येथे बुधवारी (दि. 9) घडला. अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलाला फूस लावून जंगलात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडित मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाचे वडील वाहन चालविण्याचे काम करतात. बुधवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मुलगा घरासमोर खेळत होता. एका अज्ञात व्यक्तीने मुलाला फूस लावून तळेगाव जवळील जंगलात नेले. तेथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगा रात्री अकरा वाजता घरी आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button