breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील ज्येष्ठ नेते भाईजान काझी यांचे निधन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती सय्यद इस्माईल अब्दुलकादर काझी उर्फ भाईजान काझी (वय 76 वर्षे) यांचे गुरुवारी (दि. 12 मार्च) थेरगाव येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे ते संस्थापक विश्वस्त, हजयात्रा कमिटीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मुस्लिम को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी संचालक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे माजी शहर सरचिटणीस आदी पदांवर भाईजान काझी कार्यरत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे ते दाजी होत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button