breaking-newsआंतरराष्टीय

५१ प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली एक सिगरेट

बांगलादेशमधील ढाक्याहून नेपाळला जाणारे विमान मागील वर्षी मार्च महिन्यात कोसळले. ५१ जणांना प्राण गमावावा लागलेल्या या अपघातासंदर्भातील चौकशीचा अहवाल रविवारी कंपनी सादर केला. अहवालानुसार वैमानिक कॉकपीटमध्ये धुम्रपान करत असल्याने हा अपघात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. विमानाच्या कॉकपीटमध्ये धुम्रपान करण्यास परवाणगी नसतानाही वैमानिकाने नियमांचे उल्लंघन केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

मूळची अमेरिकन कंपनी असणाऱ्या विमान कंपनीने या संदर्भातील एक अहवाल जारी केला आहे. कंपनीच्या नियमांनुसार घरगुती तसेच परदेशी उड्डाणांदरम्यान विमानात धुम्रपान करण्यास बंदी आहे. मात्र या अपघातग्रस्त विमानाचा वैमानिक धुम्रपान करत होता. कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरमधील डेटामधील माहितीमुळे वैमानिक धुम्रपान करत असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र वैमानिक धुम्रपान करत असल्याचे ऑप्रेशन विभाग तसेच नियंत्रण कक्षातील कोणाच्याही लक्षात आले नाही असं या अहवालामध्ये तपास समितीने म्हटले आहे. या वैमानिकाने सिगरेटच्या माध्यमातून केवळ तंबाखूचे सेवन केले होते. इतर कोणतेही आंमली पदार्थांचे सेवन त्याने केले नव्हते असंही या अहवालात नमूद करण्यात आले आहेत.

अपघात चौकशी आयोगानुसार हा अपघात वैमानिकाचे विमानाकडे दूर्लक्ष केल्याने झाल्याची शक्यता आहे. धुम्रपान करताना वैमानिकाचे विमानाकडे दूर्लक्ष झाल्याने त्याचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमानाचा अपघात झाला असं चौकशी आयोगाने म्हटले आहे.

नेपाळसारख्या डोंगराळ प्रदेशातील देशांमधील उंच ठिकाणी असणाऱ्या विमानतळावर विमान उतरवताना वैमानिकाने योग्य ती काळजी घेतली नाही. त्यातच या प्रदेशात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे विमान धावपट्टीवर उतरवताना अडचणी आल्याने विमान धावपट्टीवर कोसळले. विमानातील वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरमधील संवादामध्ये गोंधळ झाल्याने विमान ०२ च्या धावपट्टीवर उतरावायचे की २० नंबरच्या यावरुनही वैमानिक गोंधळात होते. ०२ धावपट्टीवर विमान उतरवण्याचे आदेश असताना विमान २० नंबरच्या धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न वैमानिकाने केल्याने विमानतळावरील यंत्रणाही गोंधळल्या. या सर्व गोंधळातच विमान धावपट्टीवर उतरताना लॅण्डींग पॉइटपासून ४४२ मीटरवर अपघातग्रस्त झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल नेपाळच्या संस्कृतिक, पर्यटन आणि हवाई वाहतूक मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

१२ मार्च २०१८ रोजी नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या अपघातामध्ये ४७ प्रवाशांबरोबरच २ कॉकपीट क्रू, २ केबिन क्रू अशा एकूण ५१ जणांना प्राण गमावावा लागला. विमानातील एकूण ६७ पैकी केवळ १६ प्रवासी बचावले. अपघातग्रस्त यूजीबी बंम्बार्डीयन प्रकारातले विमान पूर्णपणे जळून खाक झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button