पिंपरी / चिंचवड

शहीद सौरभ फराटेंच्या माता-पित्यांच्या हस्ते नूतनमध्ये ध्वजवंदन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या तळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहीद सौरभ फराटे यांच्या मातोश्री मंगल फराटे आणि पिता नंदकुमार फराटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, विश्वस्त राजेश म्हस्के, सुरेश शहा, प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, नूतन अभियांत्रिकी, एनसीईआर, पॉलिटेक्निकचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पुत्र गमावलेल्या वीरमाता मंगल फराटे यांनी अत्यंत भावनापूर्ण मनोगत व्यक्त केले. ‘देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सौरभचा मला सार्थ अभिमान आहे. एक मुलगा देशासाठी शहिद झाला असला तरी दुसरा देखील सैन्यातच कार्यरत आहे. कृतार्थ भावनेने कार्य करीत देशासाठी त्याग व वेळप्रसंगी बलिदानाची तयारी ठेऊन तरुणांनी सैन्यात यावे, असे ह्रुदयस्पर्शी आवाहन मंगल फराटे यांनी केले. संतोष खांडगे, प्रा. विजय नवले यांनीही प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पथसंचलनाचे नेतृत्व ओंकार तनपुरे याने केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली. भारताच्या विविध राज्यांमधील देशभक्तांचे कार्य दर्शविणा-या रांगोळी आणि भित्तीचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

शुभम वाळुंज याने सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. सागर जोशी यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button