breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

३३ वी सिनियर किकबाॅक्सिंग या स्पर्धेचे सांघिक विजेतेपद पिंपरी चिंचवड संघाने पटकावले

पिंपरी चिंचवड( महा ई न्यूज ) :- ३३ वी सिनियर किकबाॅक्सिंग निवड निवड चाचणी व कॅडेट व ज्युनिअर स्पर्धा बालेवाडी येथे अतिशय उत्साहाने संपन्न झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातून ९४८ खेळाडू ९० पंच व ८७ कोच एकूण ११२५ जन स्पर्धेत सहभागी झाले होते
स्पर्धेचे उद्घाटन  प्रसिद्ध उद्योजक सोलारिस चे संचालक श्री जयंत पवार व रेवाळे ग्रुप चे संचालक श्री विलास रेवाळे
वाको महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष म्हात्रे सचिव प्रविण काळे उपाध्यक्ष मंदार पनवेलकर यांच्या हस्ते संपन्न झाला
तिन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे सांघिक विजेतेपद पिंपरी चिंचवड संघाने पटकावले तर उपविजेतेपद पुणे संघाने पटकावले तिसऱ्या क्रमांकावर रायगड जिल्हा तर मुंबई उपनगर ला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले स्पर्धेचे बक्षीस वितरण आंतरराष्ट्रीय बाॅडीपावर चे
सी. ई. ओ नीकोटिन यांच्या हस्ते संपन्न झाले
 स्पर्धेत उत्कृष्ट पंच म्हणून जयश्री शेटे बुलढाणा तर प्रशांत गांगर्डे पनवेल
 तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून भार्गवी शंखे (वसई विरार) प्रविण वाघ (पिं.चि) यांनी पटकाविले
स्पर्धेचे सूत्र संचालन सागर कोळी यांनी केले
 सर्व विजेत्या स्पर्धकांची  कलकत्ता येथे होणा-या राष्ट्रीय किकबाॅक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button