breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

परशुराम आल्हाट यांचा ‘स्माईल सोशल फाउंडेशन ला मदतीचा हात’

पिंपरी | प्रतिनिधी

मोशी परिसरात गेली काही दिवस एक मनोरुग्ण महिला महिनाभर अत्यावस्थ अवस्थेत पडून होती. त्या महिलेला सावतामाळी मित्र मंडळ व संत ज्ञानेश्वर युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी योगेश मालखरे व त्यांच्या टीमला संपर्क करून बोलवून घेतले. त्यांना परिस्थिती समजून सांगितली. त्यांनी त्याची दखल घेत ‘स्माईलं सोशल फाउंडेशन’ च्या वतीने त्या महिलेला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) दाखल करून नंतर  त्यांच्या संस्थेत दाखल केले.

या वेळी तहसीलदार, पोलिस निरीक्षक गवारी, पीएसआय पंचमुख, शिवसेना नेते परशुराम आल्हाट, नगरसेविका अश्विनी जाधव, नगरसेवक कुंदन गायकवाड, राहुल बनकर, विजय आल्हाट, मॅचिंद्र बोऱ्हाडे, अमोल जगताप,रत्नाकर आल्हाट, बाबासाहेब आल्हाट, भानुदास आल्हाट, विशाल आल्हाट, सुखदेव आल्हाट, सचिन आल्हाट आदी या वेळी उपस्थित होते. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश मालखरे व रणरागिणी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा परब यांचा सन्मान परशुराम आल्हाट यांनी करून त्यांच्या संस्थेस 5000 रुपये देणगी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button