breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ती म्हणाली, ‘मला जीव द्यावासा वाटतोय’… अन् मोमो चॅलेंजसाठी मेसेज आला!

कोलकाता– ब्लू व्हेल गेम आणि किकी चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ जोरदार व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा धोकादायक गेम सर्वत्र पसरत आहे. या गेमवरून आता पश्चिम बंगालमध्ये एक तक्रार दाखल झाली आहे. पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमधील एका कॉलेज विद्यार्थिनीनं मोमो चॅलेंज प्रकरणात तक्रार नोंदवली आहे. त्या विद्यार्थिनीच्या मते, एका अज्ञातानं तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून मोमो चॅलेंज गेम खेळण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्या विद्यार्थिनीनं तक्रारी म्हटलं आहे की, स्वतःच्या आईबरोबर झालेल्या भांडणानंतर त्या विद्यार्थिनीनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली.

त्या पोस्टमध्ये तिनं आईशी भांडण झाल्यानं जीव द्यावासा वाटतोय, असं लिहिलं होतं. माझी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर थोड्याच वेळानं माझ्या मोबाइलवर एका अज्ञात व्हॉट्सअॅप नंबरवरून मेसेज आला, ज्यात मला मोमो चॅलेंज गेम खेळण्याचं आवाहन दिलं होतं. जेव्हा तिनं मेसेज पाठवणा-याला त्यांची ओळख विचारली, तेव्हा त्यानं जुजबी उत्तर दिलं. घाबरलेल्या त्या तरुणीनं संपूर्ण घडलेला प्रकार स्वतःच्या मोठ्या भावाला सांगितला. भावानंही त्या गेममध्ये सहभागी न होण्यास सांगितलं. पीडित विद्यार्थिनीनं घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button