breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

सांगोल्यात उद्या दुष्काळी परिषदेचे आयोजन; शरद पवार करणार मार्गदर्शन

सांगोला – शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या (शनिवार दि.9 ) सांगोल्यातील विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी एक वाजता दुष्काळी परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला खासदार शरद पवार यांच्यासह शेकापचे आमदार जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार गणपतराव देशमुख यांनी दिली.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, बाबासाहेब कारंडे उपस्थित होते.

आमदार देशमुख म्हणाले की, या दुष्काळी परिषदेचेखासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या परिषदेत शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे, अपूर्ण असणार्‍या टेंभू, म्हैसाळ, सांगोला शाखा व इतर सिंचन योजना त्वरित पूर्ण कराव्यात, जनावरांसाठी चारा छावण्या किंवा चारा डेपो त्वरित सुरू कराव्यात, माणसे व जनावरांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात यावा, लोकांना कामे देण्यासाठी नवीन विहिरी-शेततळे, पाणंद रस्ते, शेतरस्ते आदी कामे त्वरित सुरू करण्यात यावीत, पावसाअभावी पेरण्या न झालेल्या व करपून गेलेल्या पिकासाठी हेक्टरी 50 हजार व फळबागासाठी 1 लाख रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावेत, दुष्काळ जाहीर झालेल्या गावांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे,च मागेल त्याला मोफत वीज जोडणी देण्यात यावी, माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देण्यात यावा, सांगोला तालुक्यातील पाझर तलाव व बंधारे भरण्यात यावेत, 60 वर्षांवरील शेतकरी व कष्टकरी स्त्री-पुरूषांना दरमहा 2 हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, तरूणांना उद्योग व व्यवसायासाठी कमी व्याजाने कर्ज देण्यात यावे, यासह अनेक मागण्यांचे ठराव मांडण्यात येणार आहेत. या दुष्काळी परिषदेला शेतकर्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button