breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संत निळोबाराय पालखीचे प्रतीकात्मक प्रस्थान

  • एकोबा, तुकोबा, निळोबाच्या नामघोषाने पिंपळनेर दुमदुमले

पारनेर |

करोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर संत निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी रविवारी सकाळी ११ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रतीकात्मक प्रस्थान ठेवले.संत निळोबाराय पालखी सोहळ्याचा मानाच्या पालखी सोहळ्यात समावेश असल्याने १९ जुलै रोजी एसटीने पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

संत परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थित सर्वच भाविकांच्या चेहऱ्यावरील उत्साह सकाळपासूनच ओसंडून वाहत होता. या वेळी सर्व भाविकांची करोना चाचणी करण्यात आली व त्यानंतरच मंदिरात प्रवेश देण्यात आला.प्रस्थान सोहळ्यास रविवारी पहाटे पाच वाजता सुरुवात झाली. या वेळी संत निळोबारायांच्या वाडय़ात विठ्ठल रुक्मिणीची महापूजा,पालखीचे व पादुकांचे पूजन आमदार नीलेश लंके, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, निळोबाराय यांचे वंशज गोपाळकाका मकाशीर,तुकाराम महाराजांचे वंशज व देहू देवस्थानचे सोहळा प्रमुख माणिक मोरे,ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख बाळासाहेब अरपळकर,आळंदी देवस्थानचे ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या सोहळ्याची विधिवत पूजा दिनकर पिंगळे यांनी केली.

१८ जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम निळोबारायांच्या समाधी मंदिरात राहील.संत निळोबाराय पालखी सोहळ्याचा मानाच्या पालखी सोहळ्यात समावेश आहे.१९ जुलै रोजी पालखी सोहळा मोजक्या वारकऱ्यांसह एसटीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवील, असे संत निळोबाराय देवस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी सांगितले. या वेळी निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे,कार्याध्यक्ष अशोक सावंत,चांगदेव शिर्के,लक्ष्मण खामकर,नायब तहसीलदार अविनाश रणदिवे,डॉ. सुदाम बागल,सरपंच सुभाष गाजरे, उपसरपंच अमोल पोटे, राहुल झावरे,सुरेश पठारे,सुभाष पठारे,गणेश हजारे उपस्थित होते. दरम्यानच्या काळात संपूर्ण निळोबारायांच्या मंदिर परिसरात वारकऱ्यांनी ‘एकोबा तुकोबा निळोबा’चा नामघोष करत टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरला होता.अभंग,भजने तसेच वारीतील विविध खेळ या वेळी रंगले होते.

  • पर्यावरण संवर्धनाचे आवाहन

ज्या भाविकांना पंढरीला जाता आले नाही त्यांनी नाराज न होता आषाढी वारीची आठवण म्हणून एक झाड लावावे.ज्या वारकऱ्याचे झाड पुढील वर्षी चांगले वाढेल त्या वारकऱ्यांचा देहू देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात येईल.

– माणिकराव मोरे, तुकाराम महाराजांचे वंशज व पालखी सोहळा प्रमुख

श्रीसंत निळोबारायांच्या पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रतीकात्मक प्रस्थान ठेवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button