breaking-newsक्रिडा

राजस्थानचा मुंबईवर एकतर्फी विजय

मुंबई – जोस बटलर, अजिंक्‍य राहाणे आणि संजु सॅमसनयांच्या जबरदस्त फलंदाजी आणि जोफ्रा आर्चरच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत बाद फेरीत जाण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 6 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना राजस्थानने 18 षटकांत 3 गडी गमावत 171 धावा करत सामना जिंकला.

राजस्थानचा सलामीवीर डार्सी शॉर्ट पहिल्याच षटकात बाद झाला, त्याला केवळ 4 धावा करता आल्या. त्यानंतर कर्णधार अजिंक्‍य रहाणे आणि जोस बटलरने मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत संघाचा डाव सावरत धावफलक हालता ठेवत केवळ 5.4 षटकांतच संघाचे अर्धशतक झळकावले. त्या दोघांनी चिवट खेळी करत राजस्थानचा धावफलक हालता ठेवत 12व्या षटकांत संघाचे शतक झळकावले. त्यानंतर हार्दीक पांड्याला फटका लगावण्याच्या नादात रहाणे (37) बाद झाला. रहाणे आणि बटलरने 12.2 षटकात 959 धावांची भागीदारी केली. तर त्यानंतर आलेल्या संजुला हाताशी धरुन त्याने 61 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्का मोर्तब केला. यावेळी बटलारने 53 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 94 धावा केल्या तर सॅमसनने वेगवान 26 धावांची खेळी केली.

तत्पुर्वी, आक्रमक सुरुवात करुनही मधल्या षटकांमध्ये फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे मुंबईला पहिल्या डावात 168 धावांवर समाधान मानावं लागलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या राजस्थानच्या गोलंदाजांनी पहिल्या दहा षटकांमध्ये अतिशय स्वैर मारा केला. यात भरीस भर म्हणून क्षेत्ररक्षकांनी सूर्यकुमार यादव आणि एविन लुईसचे काही सोपे झेल टाकत गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फिरवलं. मात्र लुईस आणि सूर्यकुमार यादव जोडी माघारी परतल्यानंतर मुंबईच्या डावाची घसरगुंडी उडाली.

मधल्या फळीत हार्दिक पांड्याचा अपवाद वगळता एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने 150 धावांचा टप्पा ओलांडला. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्‍स यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. त्यांना धवल कुलकर्णी आणि जयदेव उनाडकट यांनी 1-1 बळी घेत चांगली साथ दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button